“इवलेसे रोप लावियले व्दारी
तयाचा वेलू गेला गगनावरी”
ज्ञानियांचा राजा श्री संत ज्ञानेश्वर माऊली जगतगुरू श्री संततुकाराम महाराज तसेच देवर्षी मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमित औद्योगिक व तांत्रिक प्रगतीने विकसित झालेल्या कामगार नगरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अन्न वस्त्र निवारा याबरोबर दर्जेदार शिक्षण या परिसरातील विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी प्रो. ए. सोसायटीचे सहसचिव मा. श्री शरद इनामदार सर व त्यांच्या किर्लोस्कर समूहातील सहक यांनी प्रो. ए. सो. चे तत्कालीन कार्याध्यक्ष कै. चाफेकर सर व संस्थेचे मा. सदस्य डॉ. श्री गजानन एकबोटे सर तसेच मा. श्री पांडे सर या सर्व माननियांच्या प्रयत्नातून 12 जून 1986 च्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीला निगडी यमुनानगर येथे प्रो.ए.सो. च्या संकुलाची मुहूर्तमेढ रोवली.
सन 1993 पासून मा. कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी कार्याध्यक्ष पद स्विकारल्यानंतर संस्थेत क्रांती घडून आली. मा.डॉ. एकबोटे यांच्या कार्यतत्परतेमूळे व बुध्दिचातुर्यामूळे तसेच सहकार्यांना बरोबर घेवून चालण्याच्या स्वभावामूळे कै. गुरूवर्य कानिटकर सरांनी लावलेला ज्ञानाचा दीप अधिकाधिक प्रकाशमान होत आहे व ज्ञानमयो भव हे ब्रीदवाक्य वास्तवात आणत आहे.
दर्जेदार शिक्षणाची ग्वाही देणा या प्रो.ए.सो.च्या मॉडर्न शाळेला मा. उपकार्यवाह श्री. इनामदार सर आणि सहकार्यांनी स्वत:च्या बंगल्यांमध्ये वर्ग उपलब्ध करून दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपली बहुमजली इमारत वापरण्यास दिली.त्यानंतर संस्थेने प्राधिकरणातून स्वखर्चाने
दोन एकरचा प्लाट मिळवून संस्थेची इमारत उभी केली. ’प्रोग्रेसिव्ह’ म्हणून प्रगतीशील आणि ‘मॉडर्न‘ म्हणून अाधुनिक या शब्दांशी सुसंगत प्रणालीची अंमलबजावणी करत आज मॉडर्न शिशु विद्या मंदिर दिमाखाने कार्यरत आहे.
मॉडर्न शिशु विद्या मंदिराने संस्थेच्या नावाला साजेसा प्रोग्रेस करीत 25 वर्षांची अखंडित वाटचाल रौप्य महोत्सवी वर्षाने साजरी केली. आज मॉडर्न शिशु विभागाच्या सहा तुकडयांमध्ये 361 विदयार्थी शिक्षण घेत आहे.गेल्या 25 वर्षांच्या काळात मा. गुरूवर्य चाफेकर सर मा. डॉ. एकबोटे सर मा.गुरूवर्यविघ्न्हरी देव महाराज मा.डॉ.पांडे सर मा.श्री.रायकर सर मा.श्री. गायकवाड सर मा.श्री. इनामदार सर मा.कै.श्री. किराड सर इ. मान्यवर शाळा समितीचे पदाधिकारी होते. मा.कै. श्री कटाप सर कै.सौ.सुजाता पंडीत सौ. मंजिरीतार्इ फडके कै.श्री बाळासाहेब हगवणे श्रीमती अमिता किराड आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मा.सोै. मृगजा कुलकर्णी यांनी अध्यक्षपद व प्रमुख्याध्यापक म्हणून काम केले. सौ शारदा बोरोले कै. उषा पोरे सौ. श्रध्दा वडके सौ.रमा सरदेसार्इ सौ.रजनी जाधव यांनी मुख्याध्यापिका म्हणून काम केले. सौ.शिंदे श्री.पलांडे सौ.क्षिरसागर सौ.पद्मिनी जाधव यांनी लेखनिक म्हणून काम केले. सौ.शालिनी कारेकर श्रीमती पिसे श्रीमती भुजबळ या मावशी होत्या.
कुशल निष्ठावान पदाधिका यांच्या मार्गदर्शनाखाली शिशु विभागातील मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मॉडर्न शिशु विभागाच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे. शिशु विभागात सेमी इंग्लिशमधून शिक्षण दिले जाते. शाळेत शैक्षणिक साधनांबरोबर तीनचाकी सायकली घसरगुंडी सीसॉ जंगलजीम इ.खेळणी सुध्दा मुलांसाठी उपलब्ध आहेत.
गुरूवर्य कानिटकर दिनानिमित्त 25 जानेवारीला दिला जाणारा स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार शिशु विभागास तीन वेळा प्राप्त झालेला आहे याचा सर्वांना अभिमान वाटतो. या यशामागे मा. अध्यक्षा प्रमुख्याध्यापक इतर सर्व पदाधिकारी पालक संघ मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इ. सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. अशी आमची शाळा अधिकाधिक विकासोन्मुख रहावी.मुलांनी बुध्दीवैभवाने कार्यक्षमतेन नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करावीत स्वत:चे व शाळेचे नाव उज्वल करावे यापलीकडे कोणते पसायदान मागावे.
धन्यवाद